Airtel Plans : 2 स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच, 60GB पर्यंत डेटासोबत मिळतील अनेक फायदे


एअरटेलने 489 आणि 509 रुपयांचा प्लॅन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. या दोन्ही रिचार्ज प्लॅन तुम्हाला काय फायदे देणार आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

दूरसंचार कंपनी Airtel ने अलीकडेच आपल्या Rs 99 च्या प्लॅनच्या किंमती 7 सर्कलमध्ये Rs 155 पर्यंत वाढवल्या आहेत आणि आता कंपनीने आपल्या प्रीपेड वापरकर्त्यांसाठी संपूर्ण डेटासह दोन नवीन योजना लॉन्च केल्या आहेत. या प्लॅनची ​​किंमत 489 रुपये आणि 509 रुपये आहे.

489 रुपयांच्या या एअरटेल प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता देण्यात आली आहे, एवढेच नाही तर रिचार्जवर तुम्हाला 50 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस सुविधा मिळेल.

जर तुम्हाला 1 महिन्याची वैधता असलेला प्लान हवा असेल, जो तुम्हाला भरपूर डेटा ऑफर करतो, तर या प्लानमध्ये तुम्हाला 60 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 1 महिन्याच्या वैधतेसह 300 SMS मिळतील.

डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त, या दोन्ही नवीनतम रिचार्ज योजना काही अतिरिक्त फायदे देखील देतात जसे की विनामूल्य विंक म्युझिक, हॅलो ट्यून, फास्टॅगवर कॅशबॅक आणि अपोलो 24/7 सदस्यत्व सारखे फायदे.

एअरटेलने अनेक शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे, जर तुमच्या शहरातही Airtel ची 5G सेवा सुरू झाली असेल, तर तुम्ही या योजनांसह 5G स्पीडचा आनंद देखील घेऊ शकाल.