केएल राहुल-अथियाला विराटने दिली 2 कोटींची कार, तर धोनीने दिला ‘काळजाचा तुकडा’


केएल राहुल आणि अथिया शेट्टी आता एकमेकांचे झाले आहेत. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. लग्नात पाहुण्यांचा ओघ तर होताच, पण त्यानंतर अनेक भेटवस्तूही आल्या.

क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे टीम इंडियाचे सहकारी खेळाडू केएल राहुलच्या लग्नाला पोहोचू शकले नाहीत. पण त्याला विराट कोहलीची भेट नक्कीच मिळाली आणि फक्त विराटच का, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीनेही केएल राहुलला लग्नाची अनोखी भेट दिली.

आता प्रश्न असा आहे की धोनी-विराटला भेट म्हणून काय दिले? मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी आणि विराटने केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट दिल्या.

विराट कोहलीने राहुल आणि अथियाला क्रिकेट आणि चित्रपटांचा मिलाफ असलेली बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचे वृत्त आहे. कारची किंमत सुमारे 2.17 कोटी रुपये आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नात महेंद्रसिंग धोनी पोहोचला होता. त्यांनी लग्नाला उपस्थिती नोंदवून नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले आहेत. याशिवाय त्याने आपल्या काळजाचा एक तुकडा भेट म्हणून दिला, म्हणजे त्याची सर्वात आवडती वस्तू. धोनीला बाइक्स आवडतात हे जगाला माहीत आहे आणि त्याने राहुलला कावासाकी निन्जा बाईकही भेट दिली. बाजारमूल्यानुसार या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे.