आता रोनाल्डोसोबत खेळताना दिसणार मेस्सी, सोडणार PSG!


फुटबॉल स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी लवकरच नव्या क्लबची जर्सी परिधान करताना दिसणार आहे. मेस्सी सध्या पॅरिसमधील पीएसजी या क्लबकडून खेळतो, मात्र तो लवकरच आपला क्लब बदलणार असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

मेस्सीने 2021 मध्ये PSG सोबत दोन वर्षांचा करार केला होता. हा करार या वर्षी संपणार आहे. बातमीनुसार, मेस्सी आपला करार वाढवू इच्छित नाही. त्याला दुसऱ्या क्लबकडून खेळायचे आहे. मेस्सीला विकत घेण्यासाठी अनेक दावेदार इच्छुक आहेत.

मेस्सीलाही अलीकडे अनेक चांगल्या ऑफर्स मिळाल्या आहेत. आशियाई क्लब अल हिलाल आणि अल इत्तिहाद यांनी मेस्सीला करारबद्ध करण्यात रस दाखवला होता. हे क्लब मेस्सीसाठी 30 अब्ज रुपये खर्च करण्यास तयार आहेत. या शर्यतीत अल हिलाल खूप पुढे आहे.

मेस्सीने ही ऑफर स्वीकारल्यास या शतकातील लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो या दोन महान फुटबॉलपटूंना आशियाई फुटबॉलमध्ये पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या क्लब अल नासरशी $200 दशलक्ष (वार्षिक 17 अब्ज) किमतीचा करार केला.

मेस्सीने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीचा बहुतांश काळ बार्सिलोनामध्ये घालवला. 2003 मध्ये त्याने या क्लबसाठी पदार्पण केले आणि 2021 पर्यंत ते त्याच्याशी संलग्न राहिले. 2021 मध्ये त्याने या क्लबला अलविदा केला आणि PSG मध्ये सामील झाला. त्याच्यासोबत पीएसजीचे जुने सहकारी नेमार आणि किलियन एमबाप्पे हे सामील झाले होते. आता मेस्सीचे पुढचे डेस्टिनेशन कुठे असेल हे पाहावे लागेल.