बीसीसीआय, आयपीएल आणि जाहिरातींमधून करोडोंची कमाई करतो केएल राहुल, जाणून घ्या त्याची नेट वर्थ


केएल राहुल सोमवारी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. भारताचा स्टार फलंदाज राहुल अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या घरी लग्नाचे सोहळे थाटामाटात पार पडले.

लग्नासाठी फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. ते अत्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू होती. आयपीएलच्या महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या राहुलला कोणतीही कसर सोडायची नाही.

राहुलच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे तर, तो बीसीसीआय आणि आयपीएल करार आणि जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो. राहुल बीसीसीआयच्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील आहे, ज्यातून त्याला दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात.

तो आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधारही आहे. लखनौने त्याला 17कोटी रुपयांना खरेदी केले.

तो अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीही करतो. त्यांची एकूण संपत्ती 75 कोटींच्या जवळपास आहे.