महाकालेश्वरच्या दर्शनाला टीम इंडिया, ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ इंदूरला पोहोचला आहे. पहिले दोन सामने जिंकून यजमानांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात पोहोचला.

सोमवारी सकाळी महाकालेश्वरला भेट देणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश होता. हे सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील काही लोक बाबा महाकालच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी झाले होते.

सर्व खेळाडूंनी बाबा महाकालची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले. हे सर्व खेळाडू भक्तिरसात तल्लीन होऊन ओम नमः शिवायचे पठण करताना दिसले. सूर्यकुमार यादव यांनी खासदार अनिल फिरोजिया यांच्याकडून अलौकिक सजावटीची माहिती घेतली.

दर्शनानंतर भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाले, ‘बाबा महाकालच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले हे मी धन्य आहे.’

सूर्याने पुढे सांगितले की, त्याने आपला मित्र ऋषभ पंतसाठी बाबा महाकालकडून आशीर्वाद मागितला. तो म्हणाला, ‘मी अनेक गोष्टी मागितल्या आहेत, तसेच माझा प्रिय मित्र आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा असे बाबा महाकालला सांगितले.