11 वर्षांची भयाण शांतता, आता तळपली बॅट, सुरू झाली शतकांची मालिका


11व्या मोसमापर्यंत ज्या संघासाठी बिग बॅश लीगमध्ये एकही शतक झाले नव्हते, त्या संघाच्या 12व्या हंगामात सलग दोन शतके आली. ज्या फलंदाजाला T20 साठी योग्य मानले जात नव्हते, त्याच फलंदाजाने सलग दोन्ही शतके झळकावून सर्वांना उत्तर दिले आहे. हा फलंदाज आहे स्टीव्ह स्मिथ.

T20 क्रिकेटमध्ये विशेष छाप पाडण्यात अपयशी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज स्टीव्ह स्मिथने BBL 12 मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे.

सिडनी सिक्सर्ससाठी सलामी देणाऱ्या स्टीव्ह स्मिथने शनिवारी, 21 जानेवारी रोजी त्याचा स्थानिक प्रतिस्पर्धी सिडनी थंडरविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी केली. स्मिथच्या खेळीनंतरही सिक्सर्स संघाने केवळ 187 धावा केल्या.

स्मिथने 66 चेंडूंच्या या खेळीत केवळ 5 चौकार मारले, मात्र षटकारांच्या पावसात कोणतीही कमतरता नव्हती. या स्टार फलंदाजाने या डावात एकूण 9 षटकार ठोकले. म्हणजेच 14 चेंडूत चौकारांवरून 74 धावा केल्या.

मोसमाच्या मध्यात स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या स्मिथने शेवटच्या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती. बीबीएलच्या इतिहासात सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजाचे हे पहिले शतक होते.