रोनाल्डो आणि मेस्सीसोबत हात मिळविण्यासाठी पोहोचले अमिताभ बच्चन, फोटो व्हायरल


सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एका प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लिओनेल मेस्सी पीएसजीमध्ये सहभागी झाला होता, तर रोनाल्डोने रियाध सीझन इलेव्हनचे नेतृत्व केले होते. या प्रदर्शनीय सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनही आले होते. अमिताभ बच्चन मॅच एन्जॉय करतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एमबाप्पे यांच्याशी हस्तांदोलन करतानाचे अमिताभ बच्चन यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर धुमाकूळ घालणारे हे फोटो आणि व्हिडिओ बिग बींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन येथे प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते.

या प्रात्यक्षिक सामन्यात अमिताभ बच्चन यांनी फुटबॉलच्या दिग्गजांशी संवाद साधला आणि स्टार खेळाडूंशी हस्तांदोलन केले. प्रथम तो मेस्सीसह पीएसजी खेळाडूंना भेटला आणि नंतर रोनाल्डोसह सीझन इलेव्हनच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले. या प्रदर्शनीय सामन्यात कायलियन एमबाप्पे, सर्जियो रामोस, नेमार, एमबाप्पे, रामोस, नेमार पॅरिस सेंट, सालेम अल-दवसारी आणि सौद अब्दुलहामीद हे देखील सामन्याचा भाग होते.