दुर्दैव! अंत्यसंस्कारात सहभागी होऊन केरळला घरी परतत असताना 3 जणांचा मृत्यू विमान अपघातात


नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 72 जणांपैकी केरळमधूल आलेले तीन जण अंत्यसंस्कारात सहभागी होऊन घरी परतत होते. हे तिघेही नेपाळी होते. तिघांच्याही मृत्यूनंतर केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील अनिक्कड गावात शोककळा पसरली आहे. राजू ठाकुरी, रबिन हमाल आणि अनिल शाही हे ख्रिस्ती धर्मोपदेशक मॅथ्यू फिलिप यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पठाणमथिट्टा येथे पोहोचले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ख्रिस्ती धर्मोपदेशक मॅथ्यू फिलिप दोन वर्षांपूर्वीच केरळला परतले होते. याआधी त्यांनी पोखरामध्ये 45 वर्षे घालवली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन नेपाळींशी फ्लिपचे खूप जवळचे संबंध होते. फिलिप यांचे नातू जोएल मॅथ्यू यांनी सांगितले की, विमान अपघाताची माहिती मिळताच आम्ही लोकांशी संपर्क साधला आणि मृतांची यादी पाहिली. तिघेही काठमांडू ते पोखरा या फ्लाईटमध्ये चढले होते असे आम्हाला समजले. तर आणखी दोन लोक त्याच्यासोबत काठमांडूमध्ये राहिले.

जोएलने सांगितले की, आजोबा फिलिप यांना दोन वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते पोखरातील काम सोडून केरळमधील मूळ गावी परतले. जोएलने सांगितले की, पाच नेपाळी नागरिक आजोबांना भेटण्यासाठी केरळमध्ये येत असत. अंत्यसंस्काराच्या दिवशी तो दिवसभर चर्चमध्येच राहिला. त्यांनी आमच्या घरी वेळ घालवला आणि आजोबांचे आवडते नेपाळी गाणे गायले. अंत्यसंस्कार करून ते नेपाळला परतत होते. माझे आजोबा या तिघांसाठीही वडिलांसारखे होते.

विमान अपघातानंतर आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी 26 मृतदेहांची ओळख पटली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मृतदेहांचे पोस्टमार्टम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीयांसह परदेशी नागरिकांचे मृतदेह प्रथम राजधानी काठमांडूत आणले जातील.

ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही, तेही काठमांडूत आणून डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत. काठमांडू येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी भारतीय मृतदेह घेण्यासाठी पोखरा येथे पोहोचले आहेत. ओळख पटताच भारतीय नागरिकांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील गाझीपूरला पाठवण्याची तयारी केली जाईल.