गौतम गंभीरच्या पचनी नाही पडले विराटचे शतक, बांगलादेशातील पराभवावरुन उपस्थित केले प्रश्न


श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा विजय झाला. यासह संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. म्हणजे मालिका भारताच्या नावे झाली आहे. अर्थात, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी अडचणीचा सामना करावा लागला होता, मात्र पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे विराट कोहलीचे उत्कृष्ट शतक. या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यासमोर श्रीलंकेची पडझड झाली. पण या खेळीनंतरही भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर कोहलीबद्दल भरभरून बोलला आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात कोहलीने 113 धावांची खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात हा फलंदाज फार काही करू शकला नाही आणि चार धावा करून बाद झाला. कोहलीने बांगलादेश दौऱ्यावरील शेवटच्या वनडेतही शतक झळकावले होते.

दुसऱ्या सामन्यादरम्यान, गंभीर आणि भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर मिड शोमध्ये तज्ञाच्या भूमिकेत होते आणि यादरम्यान गंभीरने कोहलीच्या कामगिरीबद्दल बरेच काही सांगितले. बांगलादेश दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेतील पराभवाची आठवण करून देताना तो म्हणाला, भारताला त्यांच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले हे आपण विसरू नये. हे आपण विसरलो आहोत. वैयक्तिक यश नक्कीच महत्वाचे आहे. तुमच्या रेकॉर्डमध्ये शतक किंवा अर्धशतक झाले की बरे वाटते पण बांगलादेशात जे घडले ते तुम्ही विसरता कामा नये. तो एक चांगला धडा होता.

तो म्हणाला, भारताचा पूर्ण ताकदीचा संघ बांगलादेशमध्ये पराभूत झाला. मला वाटते की या (श्रीलंका) मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण बांगलादेश मालिकेतून शिकून पुढे जायला हवे. भूतकाळात जे घडले ते विसरता येणार नाही.

भारताने दुसरा सामना जिंकला, पण त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. तत्पूर्वी गोलंदाजी करताना भारताने श्रीलंकेला मोठी धावसंख्या करू दिली नाही आणि या संघाला केवळ 215 धावांत गुंडाळले. लक्ष्य सोपे होते, पण टीम इंडिया अडचणीत आली होती. संघाने केवळ 86 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर केएल राहुलने एक टोक राखून संघाला विजय मिळवून दिला. त्याने 64 धावांची नाबाद खेळी खेळली. या फलंदाजाने आपल्या डावात सहा चौकार मारले.