केंद्र सरकारने हजसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हज यात्रेतील व्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपुष्टात आली आहे. हज यात्रेसाठी व्हीआयपी कोटा राखीव जागा रद्द करण्यात आल्या आहेत. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याक मंत्री तसेच हज समिती यांना देण्यात आलेला जवळपास VIP कोटा रद्द करण्यात आला आहे. 2012 मध्ये 5000 VIP कोटा लागू करण्यात आला होता. मात्र आता हा कोटा रद्द करण्यात आला आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय, हज यात्रेतील VIP कल्चर संपणार
आता व्हीआयपी कोट्यातील जागा थेट सर्वसामान्यांना दिल्या जातील. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस पसरत असल्याच्या चिंतेमुळे लादण्यात आलेले निर्बंध हलके झाल्यानंतर सौदी अरेबियातील वार्षिक हज यात्रा या वर्षी महामारीपूर्व पातळीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
2019 मध्ये, 24 लाख लोकांनी वार्षिक तीर्थयात्रेत भाग घेतला, परंतु 2020 मध्ये महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियाने यात्रेकरूंची संख्या केवळ 1000 पर्यंत मर्यादित केली. हे पाऊल अभूतपूर्व होते कारण 1918 च्या फ्लूच्या साथीच्या काळातही हे केले गेले नव्हते, जेव्हा जगभरात लाखो लोकांना या आजाराने आपले प्राण गमवावे लागले होते. सन 2021 मध्ये सौदी अरेबियातील सुमारे 60 हजार रहिवाशांना हज करण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या वर्षी सुमारे 10 लाख लोकांनी वार्षिक धार्मिक तीर्थयात्रा केली होती.
त्याचवेळी भारतातून यावर्षी 1.75 लाख लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशातील 30 हजार यात्रेकरू हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाऊ शकणार आहेत. उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष आणि भारतीय हज समितीचे सदस्य मोहसिन रझा यांनी मंगळवारी सांगितले की, 2023 साठी भारतातील 1.75 लाख हज यात्रेकरूंचा कोटा राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त हज यात्रेकरू हज यात्रेला जाऊ शकतील.
उत्तर प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्ष आणि भारतीय हज समितीचे सदस्य मोहसीन रझा यांनी मंगळवारी सांगितले की, हज 2023 साठी भारताला 2.5 लाखांचा कोटा मिळाला आहे. देशभरातील बहुतांश हज यात्रेकरू उत्तर प्रदेशातून हजला जाणार आहेत. ते म्हणाले की, यूपीमधून 30 हजारांहून अधिक हज यात्रेला जाणार आहेत. हज पॉलिसी 2023 येत्या आठवड्यात जारी केली जाईल आणि हज 2023 साठी अर्ज सुरू केले जातील. हज यात्रेकरूंना सरकार सर्वोत्तम सुविधा देणार आहे.