IIT JEE Mains : 12वीत 75% मार्कांची उठाठेव संपली, पण प्रत्येकाची नाही


अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) संदर्भात मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लाखो उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने JEE Mains 2023 मधील 75% गुणांचा निकष काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा लाभ सर्वांनाच मिळणार नाही. IIT JEE मधील 75% गुणांचे निकष अंशतः रद्द केले जात आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ते काय म्हणाले माहित आहे?

शिक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड, बिहार बोर्ड, यूपी बोर्ड, राजस्थान बोर्ड यासह देशातील सर्व शिक्षण मंडळांच्या टॉप 20 टक्के विद्यार्थ्यांना हा दिलासा दिला जात आहे. म्हणजेच, जर तुम्ही 12वी बोर्डाच्या परीक्षेत तुमच्या बोर्डाच्या टॉप 20 टक्केवारीत आलात, तर तुम्हाला IIT JEE परीक्षा (JEE Advanced) देण्यासाठी बोर्डात 75% गुणांची आवश्यकता नाही. कमी गुण मिळवूनही, तुम्ही JEE Advanced परीक्षा देऊ शकाल, जर तुम्ही JEE Mains परीक्षेत टॉप 2.5 लाख उमेदवार आलात.

IIT JEE: टॉप 20 पर्सेंटाइल का?
एका सूत्राने सांगितले की, 20 पर्सेंटाइल निकष 12वीच्या बोर्ड परीक्षेत एकूण 75 टक्केपेक्षा कमी गुण मिळवलेल्या उमेदवारांना मदत करेल. टॉप 20 पर्सेंटाइल उमेदवारांपैकी अनेकांना विविध राज्य मंडळांमध्ये 75 टक्के गुण मिळालेले नाहीत. विशेषत: अशी अनेक राज्य मंडळे आहेत, जिथे 350 पेक्षा कमी गुण मिळालेल्या मुलांचा टॉप 20 टक्केवारीच्या यादीत समावेश होतो. कारण- त्या बोर्डांची कडक मार्किंग योजना. म्हणून, मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की जर एखादा विद्यार्थी टॉप 20 टक्केवारीत असेल तर तो/ती JEE Advanced साठी पात्र आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE Advanced, संयुक्त प्रवेश परीक्षा पात्रता निकष शिथिल करण्याच्या सततच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. JEE Advanced मध्ये बसण्यासाठी संबंधित शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेत एकूण किमान 75 टक्के गुण आवश्यक आहेत. मात्र, कोविडच्या काळात दोन वर्षांसाठी हा नियम सर्वांसाठी पूर्णपणे रद्द करण्यात आला. मात्र यंदा पुन्हा त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

जेईई मुख्य परीक्षा सत्र 1 साठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 12 जानेवारी रोजी संपत आहे. 24 ते 31 जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे.