Deepika Pregnancy: सैल ड्रेस, फ्लॅट स्लीपर आणि रणवीरची अतिरिक्त काळजी, गरोदर आहे का दीपिका…


लूज फिट ड्रेस, फ्लॅट स्लीपर, हातात सामान नाही आणि पती रणवीर सिंगची एक्स्ट्रा काळजी… हे बघून दीपिका आणि रणवीर सिंगच्या आयुष्यात काहीतरी चांगली बातमी येणार आहे असे वाटते. दीपिका पादुकोणची चाल आणि स्टाईल पाहून अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळावर रणवीरसोबत पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. दीपिकाच्या बॉडी लँग्वेजने पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. या जोडप्याच्या घरी या गुड न्यूजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

गर्भवती आहे का दीपिका पादुकोण ?
दीपिका पादुकोणने नुकतेच पती रणवीर सिंगसोबत नवीन वर्ष आणि वाढदिवस साजरा केला. दीपिकाने रणवीर सिंगने शूट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाच्या चेहऱ्यावरील ग्लो आणि कोझी स्टाइल पाहून चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज येत आहे. पांढऱ्या फुल स्लीव्हज शर्ट आणि पिवळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये दीपिका खूपच आकर्षक दिसत आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते. दोघांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा परिस्थितीत दीपिका आणि रणवीर आई-वडील होणार याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. एका मुलाखतीदरम्यान दीपिकाला गर्भधारणा आणि मुलाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली होती- ‘रणवीर आणि मला दोघांनाही मुले खूप आवडतात. आम्हा दोघांनाही आमचं मूल होईल, पण कधी ते माहीत नाही.

पठाण या चित्रपटात दिसणार आहे दीपिका
दीपिका सध्या तिच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खान आणि दीपिकाचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बराच वाद झाला आहे. बेशरम रंग या गाण्यातील दीपिकीची भगवी बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर बराच वाद झाला होता, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स कापले होते. पठाण हा चित्रपट 25जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.