कोण आहे सूर्यकुमारचा सिक्रेट कोच, ज्याने 7 वर्षात SKY ला बनवले नंबर वन फलंदाज


सूर्यकुमार यादव… अवघ्या 2 वर्षात अनेक कर्तृत्व गाजवणारे नाव. 2 वर्षातच तो जगातील नंबर वन टी-20 बॅट्समन बनला आहे. एवढेच नाही तर तो भारतीय संघाचा प्राण बनला आहे.

आता संघ व्यवस्थापनानेही सूर्यावर विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत उपकर्णधार बनवण्यात आले आहे. जिथे त्याने एकट्याने भारताला 2-1 अशी मालिका जिंकून दिली. भारताचा स्फोटक फलंदाज सूर्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली होती.

सूर्याने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याचे अप्रतिम शॉट्स आणि फिटनेस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सामन्यानंतर सूर्याने प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी त्याच्या फिटनेसबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या.

बीसीसीआय टीव्हीवरील संभाषणादरम्यान त्याने आपल्या फिटनेस प्रवासाबद्दल सांगितले आणि या संभाषणात त्याच्या प्रशिक्षकाचे रहस्यही उघड झाले. सिक्रेट कोचमुळे तो जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनला. हा सिक्रेट कोच दुसरा कोणी नसून त्याची पत्नी देविशा आहे.

सूर्याने सांगितले की, 2016 मध्ये लग्नानंतर माझ्या पत्नीने पोषणतज्ञ आणि फिट राहण्याचा आग्रह धरला आणि त्यावर काम केले. घरी आल्यावर आम्ही दोघं क्रिकेटवर खूप गप्पा मारायचो. आपण चांगले कसे होऊ शकतो, यावर चर्चा करायचो. या पातळीवर एक पाऊल पुढे कसे टाकता येईल आणि तसे करण्यात आम्हाला आनंद वाटायचा.