सानिया मिर्झा की शोएब मलिक, कोण आहे दोघांपैकी सर्वात श्रीमंत ?


भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची बातमी आली होती, त्यातच आता तिने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

सानियाने दुबईत फेब्रुवारीमध्ये शेवटच्या वेळी कोर्टात जाणार असल्याची पुष्टी केली आहे. भारतीय स्टारने आपल्या करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही काळ त्यांच्या आयुष्यातही उलथापालथ झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएब आणि सानिया वेगळे झाले आहेत. सानिया आणि शोएब या दोघांच्या कमाईची तुलना केली तर दोघांमध्ये समान स्पर्धा आहे.

2022 मध्ये, भारतीय स्टारची एकूण संपत्ती 185 कोटी रुपयांच्या जवळपास होती. टेनिसशिवाय सानिया एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. दुसरीकडे, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची एकूण संपत्ती 230 कोटींच्या जवळपास आहे.