Corona Virus : Covishield ही लस Covacine पेक्षा अधिक प्रभावी, अभ्यासात आले समोर


नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की कोविशील्ड लस कोरोनाच्या विविध प्रकारांविरुद्ध (सार्स-कोव्ह-२) कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी आहे. या संशोधनाची प्री-प्रिंट शुक्रवारी इंटरनेटवर पोस्ट करण्यात आली. तथापि, या अभ्यासाचे पुनरावलोकन करणे बाकी आहे. हा अभ्यास जून 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान 691 सहभागींवर करण्यात आला. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांनी या संशोधनात भाग घेतला आणि पुणे आणि बंगळुरूमध्ये एकूण 4 ठिकाणी हे संशोधन झाले. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा समावेश होता.

संशोधनानुसार, कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोघांनीही कोरोना विषाणूची लागण न झालेल्या म्हणजेच सेरोनेगेटिव्ह आणि ज्यांना संसर्ग झाल्यानंतर बरे झाले अशा लोकांमध्ये पुरेशा प्रमाणात विषाणूविरूद्ध प्रतिपिंड तयार केले. संशोधनात सहभागी झालेल्यांना एकतर कोवॅक्सिनचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने किंवा कोविशील्डचे दोन्ही डोस तीन महिन्यांच्या अंतराने दिले गेले. तपासणीत असे आढळून आले की ज्या लोकांना Covishield चा डोस देण्यात आला होता त्यांची प्रतिकारशक्ती Covaxin चा डोस घेतलेल्या लोकांपेक्षा चांगली होती.

इम्युनोलॉजिस्ट आणि हा अभ्यास करणार्‍या लोकांपैकी एक असलेल्या विनिता बल सांगतात की तरुणांमध्ये कोविड लसीच्या परिणामात फरक दिसून आला. ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली नव्हती, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीजची पातळी कोवॅक्सीनपेक्षा कोविशील्ड लसीने चांगली असल्याचे आढळून आले. संशोधनात असेही आढळून आले की कोविशील्ड लसीने निर्माण केलेली प्रतिकारशक्ती कोवॅक्सिनपेक्षा जास्त आहे. तथापि, अभ्यासात असेही दिसून आले आहे की ज्यांनी कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले त्यांच्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराविरूद्ध कोविशील्डच्या तुलनेत किंचित जास्त प्रभावी अँटीबॉडीज आहेत.

तुम्हाला सांगतो की संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोना महामारीची भीती वाढत आहे. चीनमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तिथले लोक मोठ्या संख्येने कोरोनाला बळी पडत आहेत. भारतातही शनिवारी कोविड 19 चे 214 नवीन रुग्ण नोंदवले गेले. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या संक्रमित लोकांची संख्या 2509 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 4.46 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच वेळी, देशात या साथीच्या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5 लाख 30 हजारांच्या पुढे गेली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही