प्रायव्हेट पार्ट दाखवत महिलेवर लघूशंका करणाऱ्या प्रवाशांवर एअर इंडियाने घातली 30 दिवसांची प्रवास बंदी


मुंबई : न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने महिला प्रवाशावर लघवी करणाऱ्यावर एअर इंडियाने कारवाई केली आहे. एअर इंडियाने एका महिला प्रवाशासोबतचे अनुचित आणि असभ्य वर्तन लक्षात घेऊन त्याच्यावर 30 दिवसांची बंदी घातली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडियाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणी अहवाल मागवला होता. अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेबद्दल आधीच पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि एअर इंडिया कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना तसेच नियामक प्राधिकरणांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. विमान कंपनीने पुढील कारवाईसाठी विमान वाहतूक नियामक डीजीसीएला प्रकरण कळवले असल्याचे सांगितले.

प्रवक्त्याने सांगितले की, पहिली पायरी म्हणून, एअर इंडियाने प्रवाशाला 30 दिवसांसाठी बंदी घातली आहे आणि पुढील कारवाईसाठी डीजीसीएला अहवाल दिला आहे. एअरलाइन्सने सांगितले की एअरलाइनच्या क्रूच्या त्रुटी पाहण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे.

अंतर्गत चौकशीसाठी समिती
एअर इंडियाच्या क्रूच्या चुकांची चौकशी करण्यासाठी आणि परिस्थितीचे त्वरित निराकरण करण्यात विलंब करणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही एक अंतर्गत समिती देखील स्थापन केली आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. तपासादरम्यान आम्ही पीडित प्रवासी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नियमित संपर्कात आहोत. डीजीसीएने याप्रकरणी एअर इंडियाकडून अहवाल मागवला आहे.