२०२४ निवडणुकात राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा
कॉंग्रसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून नाही तर पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असे जाहीर केले आहे. शुक्रवारी पीटीआयला मुलाखत देताना कमलनाथ बोलत होते.
जगाच्या इतिहासात कुणीच आजपर्यंत ३५०० किमीची पैदल यात्रा केलेली नाही. भारतासाठी गांधी कुटुंबाइतका त्याग कुठल्याच कुटुंबाने केलेला नाही. राहुल सत्तेचे राजकारण करत नाहीत तर जनतेचे राजकारण करतात. जनतेचे राजकारण करणाऱ्याला जनताच सिंहासनावर बसवते असे यावेळी कमलनाथ म्हणाले. राहुल यांची भारत जोडो यात्रा राजकीय नाही तर भारताला तोडणाऱ्या शक्तींना पराजित करण्यासाठी आहे. देशातील द्वेष भावना दूर करणे हाही त्यामागचा हेतू आहे.
निवडणुकीत कॉंग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त करून कमलनाथ म्हणाले, भारत जोडो यात्रेनंतर कॉंग्रेस कार्यकर्ते दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत. त्याचा फायदा कॉंग्रेसला नक्कीच मिळणार आहे.