एकाचवेळी ११ शहरात जिओची ट्रू फाईव्ह जी सेवा सुरु

बुधवारी रिलायंस जिओने देशातील ११ शहरात एकाचवेळी ट्रू फाईव्ह जी सेवा सुरु केली असून त्यात लखनौ, त्रिवेंद्रम, मैसूर,नाशिक, औरंगाबाद, चंडीगड, मोहाली, पंचकुला, झीरकपूर, खरार व डेराबस्सी या शहराचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी युजर्स कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता १ जीबीपीएस स्पीड ने अनलिमिटेड डेटा वापरू शकणार आहेत. त्यासाठी वेलकम ऑफर साठी निमंत्रणे दिली गेली आहेत.

जिओ अधिकारी म्हणाले जेव्हापासून ट्रू फाईव्ह जी रोलआउट केले आहे त्यातील हा सर्वात मोठा लाँच आहे. ही शहरे पर्यटन आणि शिक्षण केंद्रे आहेत. येथे चांगले नेटवर्क ई गव्हर्नंस, शिक्षण, ऑटोमेशन, एआय, गेमिंग, हेल्थकेअर, कृषी, आयटी, एसएमईएस विकास होण्यास अपरिमित संधी उपलब्ध करून देईल. यापूर्वी मध्यप्रदेशात उज्जैन पासून फाईव्ह जी सेवा सुरु केली गेली आहे. गुजराथच्या ३३ जिल्हा मुख्यालयात २५ नोव्हेंबर पासून ही सेवा दिली जात आहे. पुणे,दिल्ली मध्ये ही सेवा अगोदरच सुरु झाली आहे.

ट्रायच्या रिपोर्ट नुसार टेलिकॉम मार्केट मध्ये रिलायंस जिओचा शेअर ३६.६६ टक्के वरून वाढून ३६.८५ टक्क्यांवर गेला आहे.