रशियन सैनिकांना स्पर्म स्टोर सुविधा मिळणार
युक्रेन युध्द सुरु झाल्यापासून अनेक रशियन सैनिकांना युद्धभूमीवर जावे लागत आहे. अश्या वेळी रशियन वकील इगोर तुनोव्ह यांनी सैनिकांना त्यांचे शुक्राणू स्टोर करण्याची परवानगी द्यावी अशी केलेली मागणी रशियन सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार रशियाच्या क्रायो बँकेत ही सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या बँकेत स्पर्म आणि सीमन (शुक्राणू आणि वीर्य) सुरक्षित ठेवले जाते. रशियन न्यूज एजन्सी टासने ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जे सैनिक २०२२ ते २०२४ या काळात स्पेशल लष्करी कारवाईत हिस्सा घेतील त्यांना ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. बीबीसीच्या रिपोर्ट नुसार रशियात ऑक्टोबर नंतर स्पर्म स्टोर ट्रेंड मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रशियाने सप्टेंबर मध्ये आंशिक लामाबंदी लागू केली आहे. यात लष्करी ट्रेनिंगचा अनुभव असलेले लोक आणि माजी सैनिकांना देशाबाहेर जाण्यास बंदी केली गेली आहे. या प्रकारे रशियाने ३ लाख रिझर्व सेना तयार ठेवली आहे. युद्धावर जावे लागले आणि त्यात मारले गेलो तरी आपला वंश पुढे सुरु राहील याचा दिलासा या स्पर्म स्टोर सुविधेमुळे सैनिकांना दिला जात असल्याचे सांगितले जात आहे.