स्मार्टफोनला सुरक्षित करणारे स्मार्टलॉक फिचर

आज ज्या वेगाने स्मार्टफोन अधिक स्मार्ट होत आहेत त्याच वेगाने युजरची सुरक्षा आणि प्रायव्हसी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे फोन निर्माते युजरची सुरक्षा आणि प्रायव्हसी राखली जावी यासाठी प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी स्मार्टफोन मध्ये नवी फीचर्स सातत्याने येऊ लागली असून आयओएस आणि अँड्राईड दोन्ही फोन साठी प्रायव्हसी अधिक सुरक्षित केली जात आहे. विशेष म्हणजे फोन ग्राहक सुद्धा असे फोन खरेदी करण्यात रस दाखवत आहेत.

सर्वसाधारणपणे आज अनेक स्मार्टफोन मध्ये पासकोड, पॅटर्न लॉक, फिंगर प्रिंट लॉक, फेस अनलॉक अशी अनेक सुरक्षा फीचर्स दिली गेली आहेत. गुगलने यातच स्मार्टलॉक हा आणखी एका पर्याय दिला आहे. स्मार्टलॉक उघडून फोन सुरु केला तर पुन्हा पुन्हा पासवर्ड देण्याची गरज राहत नाही. पण याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे जो पर्यंत फोन युजरच्या हातात आहे तो पर्यंत तो अनलॉक राहतो पण फोन खाली ठेवला कि आपोआप लॉक होतो. विशेष म्हणजे तुमच्या खात्रीच्या ठिकाणांची निवड करून तुम्ही तेथे फोन अनलॉक ठेवण्याची सुविधा यात दिली गेली आहे.