टेस्लाने चीनच्या शांघाई कारखान्यात बंद केले कार उत्पादन

चीन सध्या करोनाशी लढाई करत असतानाच आणखी एक जोरदार धक्का चीनी सरकारला बसला आहे. करोना मुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळू लागली आहे आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अश्या परिस्थितीत अमेरिकेची जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रीक वाहन निर्माती टेस्ला कंपनीने चीनच्या शांघाई मधील गिगा फॅक्टरी बंद केल्याची घोषणा केली आहे. अन्य टेस्ला कारखान्याच्या तुलनेत येथे सर्वाधिक पातळीवर इलेक्ट्रिक कार तयार केल्या जातात.

शनिवारी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना गिगा प्रकल्पावर सकाळची शिफ्ट रद्द झाल्याचे सांगितले गेले आणि ब्रेक सुरु ठेवा असे म्हटले गेले. कारखाना किती काळासाठी, का बंद केला याचे कोणतेही कारण व्यवस्थापनाने दिलेले नाही. मिडिया रिपोर्ट नुसार गेले काही दिवस टेस्ला कार उत्पादन बंद होईल अश्या बातम्या येत होत्या. रॉयटरच्या महिन्याच्या सुरवातीला दिल्या गेलेल्या एका रिपोर्टमध्ये  टेस्ला मॉडेल वायचे उत्पादन डिसेंबर २५ पासून शांघाई येथील गिगा कारखान्यात बंद केले जाईल असे म्हटले होते. करोना संक्रमण वाढत असल्याने कारखाना बंद ठेवला गेल्याचे काही रिपोर्ट येत आहेत.