मिशेल आणि बराक ओबामा यांच्या रोमान्सचा मजेदार किस्सा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल हे जोडपे जगातील वलयांकित जोडप्यात गणले जाते. अध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यावर सुद्धा मिशेल आणि ओबामा अजूनही तितकेच पॉप्युलर आहेत. मिशेल यांनी बराक बरोबरच्या रोमान्सचा एक मजेदार किस्सा नुकताच शेअर केला आहे. केली क्लार्क शो मध्ये बोलताना हा किस्सा मिशेल यांनी सांगितला आणि सत्ता स्थानाची पॉवर प्रेमात अडचण बनू शकते याचे दर्शन घडविले.

मिशेल आणि ओबामा यांच्या विवाहाला ३० वर्षे झाली. त्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या हनिमून आठवणी पुन्हा ताज्या करण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघे भाड्यावर कार घेऊन कॅलिफोर्निया बीचवर मौजमस्ती साठी गेले. १९९२ मध्ये त्यांनी विवाह झाल्यवर याच प्रकारे हनिमून साजरा केला होता. तेथे तेव्हा बीचवर ओबामानी मिशेल यांना कीस केले होते. पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. ओबामा आता माजी अध्यक्ष आणि मिशेल माजी फर्स्ट लेडी. त्यामुळे यावेळी त्यांच्यासोबत नियमानुसार २० कमांडो सुरक्षेसाठी होते.

आठवणी ताज्या करायच्या असल्याने ओबामा यांनी मिशेल यांना येथे कीस केले पण आजूबाजूला उभे असलेले कमांडो त्यामुळे बावरून गेले आणि अनेकानी डोळे मिटून घेतले तर काही कमांडोनी दुसरीकडे नजर वळवली. परिस्थिती मोठी विचित्र झाली असे मिशेल सांगतात. त्या म्हणाल्या चोवीस तास कमांडोच्या पहाऱ्यात असल्याने खासगीपण कमी होते हे खरे पण हे सुरक्षा रक्षक आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत असे आम्ही मानतो. आमच्या सुरक्षेसाठी ते कायम तयार असतात.

अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्षांना कडेकोट सुरक्षा कवच पुरविले जाते आणि ओबामा यांना आयुष्यभर असे कवच मिळणार आहे. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात २० स्पेशल कमांडो आहेत.