रेडमी के ६० सिरीज २७ डिसेंबरला लाँच

रेडमी के ६० सिरीज २७ डिसेंबरला चीन मध्ये सादर होणार असल्याचे सांगितले जात असून ३१ डिसेंबर पासून हे फोन विक्रीसाठी उपलब्ध होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. कंपनीचे प्रमुख लु वेईबिंग यांनी स्वतः रेडमी के ६० सिरीज लवकरच सादर केली जात असल्याचे वायबो इंटरनेट साईटवर पोस्ट केले आहे मात्र त्यांनी त्यात तारीख आणि वेळ याचा उल्लेख केलेला नाही.

भारतीय टिप्सटर साहिल करोल यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्ट मध्ये के ६० लाँचची तारीख आणि अन्य माहिती दिली आहे. या सिरीज मध्ये के ६० आणि के ६० प्रो सामील असतील. या फोनसाठी लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८ जेन टू एसओसी असेल. ६७ डब्ल्यू फास्ट चार्जिंग,३० डब्ल्यू वायरलेस चार्जिंग सह ५५०० एमएएच बॅटरी दिली जाईल. ६.६७ इंची डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेट,पैकी प्रायमरी कॅमेरा ६४ एमपी, ८ एमपी अल्ट्रावाईड लेन्स आणि २ एमपी मॅक्रो लेन्स दिले जाईल. सेल्फी साठी १६ एमपी कॅमेरा असेल असे म्हटले जात आहे.