बँक ऑफ इंग्लडने राजा चार्ल्स तीनची प्रतिमा असलेली नवी नोट आणली

ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंडने मंगळवारी ब्रिटनचे महाराजा चार्ल्स तृतीय यांची प्रतिमा असलेल्या बँक नोटेच्या पहिल्या संच डिझाईनचे अनावरण केले आहे. युकेच्या प्रमुख सरकारी बँकेने ७४ वर्षीय राजा चार्ल्स तृतीय यांची प्रतिमा ५, १०, २० आणि ५० पौंड प्लास्टिक नोटांवर छापली आहे. मात्र सध्याच्या या मूल्यांच्या नोटांच्या डिझाईन मध्ये बदल केला गेलेला नाही. या नोटांवर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रतिमा आहे.

पुढच्याच्या पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये या नोटा चलनात येतील असा अंदाज आहे. वित्त मंत्रालय आणि अन्य सर्व संस्था त्यासाठी वेगाने काम करत आहेत. बँकेचे गव्हर्नर अँड्र्यू बेली म्हणाले, नवीन नोटा डिझाईन जारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यावर महाराजा चार्ल्स यांची प्रतिमा आहे. अर्थात महाराणी एलिझाबेथ यांची प्रतिमा असलेल्या नोटा सुद्धा चलनात राहणार आहेत. काही नाण्यांवर सुद्धा महाराजा चार्ल्स  तृतीय यांची प्रतिमा कोरली जात आहे. हा देशासाठी महत्वपूर्ण क्षण आहे.

किंग चार्ल्स थर्ड हे नोटेवर प्रदर्शित होणारे ब्रिटनचे दुसरे सम्राट आहेत. २०२४ मध्ये या नोटा चलनात आल्यावर सर्वसामान्य नागरिक त्यांचा वापर करू शकणार आहेत.