फिफा वर्ल्ड कप, विजय आर्जेन्टिनाचा, केरळात जल्लोष, दारू विक्रीचे झाले रेकॉर्ड

भारतात फुटबॉल क्रिकेट इतका लोकप्रिय नाही. मात्र काही राज्यात क्रिकेट पेक्षा फुटबॉल अधिक लोकप्रिय असून या राज्यात फुटबॉल प्रेमी मोठया संखेने आहेत. फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना कतार मध्ये झाला आणि त्यात आर्जेन्टिनाने विजय मिळविला. या विजयाचा जल्लोष केरळ राज्यात दणक्यात झाला हे केरळ सरकारने जाहीर केलेल्या दारू विक्रीच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

रविवारी सामन्याच्या दिवशी केरळात तब्बल ५६ कोटींची दारूविक्री झाली. म्हणजेच आर्जेन्टिनाचा विजय साजरा करण्यासाठी केरळ वासियांनी ५६ कोटींची दारू रीचवली. केरळात रोज सरासरी ३५ कोटींची मद्य विक्री होते. ओणम, नाताळ अश्या सणांच्या दिवसात हा आकडा ५० कोटींवर जातो. पण रविवारच्या विक्रीने नवे रेकॉर्ड नोंदविले. एकूण ५६ कोटी विक्रीपैकी ४९.४० कोटींची विक्री दारू आणि बिअर ठोक विक्रेते केरळ स्टेट बेवरेजेस कार्पोरेशनने केली तर केएसबीसी आणि मार्केट फेडच्या दुकानांतून ६ कोटींची विक्री झाली.