तीस नाही वीस मिनिटात मिळणार डॉमिनोजचा गरमगरम पिझ्झा

डॉमिनोज इंडियाचा विकास देशपातळीवर वेगाने होत आहे. भारतात कंपनीला मोठ्या संधी आहेत. त्यामुळे देशात पिझ्झा प्रेमीना कमीत कमी वेळात, गरमागरम, स्वादिष्ट पिझ्झा घरपोच देण्यासाठी कंपनीने नवी योजना आणली आहे. त्यानुसार ऑर्डर देताच फक्त २० मिनिटात पिझा घरपोच मिळणार आहे. पूर्वी हा वेळ ३० मिनिटे होता. कंपनीचे चीफ ऑफिसर रसेल वेनर म्हणाले जगभरात डॉमिनोज नेटवर्क मध्ये अमेरिकेनंतर भारत त्यांचे दुसरे मार्केट आहे. त्यामुळे येथे अधिक चांगली सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे डिलिव्हरीचा वेळ कमी करताना डिलिव्हरी रायडर्सच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.

कंपनीने फूड क्वालिटी, इनस्टोअर प्रोसेस सुधारणा, टेक्नोलॉजी अपग्रेड सह अनेक बदल कामकाजात केले आहेत. २० मिनिट डिलिव्हरी सेवा सध्या १४ शहरात २० झोन मध्ये १०० सेन्टर्स वर सुरु झाली आहे आणि लवकरच या सेवेचा संपूर्ण देशभर विस्तार केला जात आहे असे सांगितले जात आहे.