आर्जेन्टिना – फुटबॉल इतकेच सुंदर दिसण्याचे वेड असलेला देश

फिफा वर्ल्ड कप चँपियन आर्जेन्टिना या देशाबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. लॅटीन म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधातील हा देश अतिशय निसर्गसुंदर आहे पण या देशाने ४० वर्षे स्पेनची गुलामगिरी भोगली आहे. स्वातंत्र्यासाठी या देशाने सतत लढा दिला आणि अखेरी ९ जुलै १८१६ या दिवशी हा देश स्वप्नच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मात्र त्यानंतर ४४ वर्षांनी या देशाला आर्जेन्टिना असे नाव दिले गेले आहे. आर्जेन्टिना हा लॅटीन शब्द असून त्याचा अर्थ आहे चांदी सारखा चमकणारा. स्पॅनिश ही येथील अधिकृत भाषा असली तरी स्पॅनिशला जवळ असलेली केस्टीलियन भाषा येथे मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. शिवाय इंग्रजी, अरबी, जर्मन भाषा सुद्धा बोलल्या जातात.

आर्जेन्टिना मध्ये फुटबॉल हा राष्ट्रीय खेळ आहे आणि जागोजागी लहानांपासून तरुणांपर्यत फुटबॉल खेळणारे दिसतात. त्याच बरोबर येथे नागरिकांना सुंदर दिसण्याचे फार वेड असून त्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी मोठ्या प्रमाणावर करून घेतल्या जातात. विदेशातून सुद्धा येथे अनेक लोक कॉस्मेटिक सर्जरी करून घेण्यासाठी येतात. देशातील प्रत्येकी ३० पैकी एक व्यक्ती कॉस्मेटिक सर्जरी करून घेतो असे आकडेवारी सांगते. त्यामुळे येथे कॉस्मेटिक सर्जरी पर्यंटन मोठ्या प्रमाणावर होते. आर्जेन्टिना छोट्या परिवारावर विश्वास ठेवणारा देश असला तरी येथे बुजुर्ग लोकांना सन्मानाने वागविले जाते.

आर्जेन्टिना अप्रवासी म्हणजे स्थलांतरित लोकांचा देश मानला जातो कारण २० व्या शतकाच्या सुरवातीला येथे ६६ लाख लोक स्थलांतर करून आले त्यातील बहुतेक स्पेन आणि इटली मधले होते. त्यामुळे या देशावर युरोपीय संस्कृतीचा पगडा आहे. राहणीमान, खाणे पिणे, वेशभूषा यावर हा परिणाम दिसून येतो. आर्जेन्टिना मध्ये दुपारी वामकुक्षी महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे दुपारी शाळा, बाजार, ऑफिसेस बंद असतात. टांगो डान्स येथे अतिशय लोकप्रिय आहे. हा सर्व देश पूर्ण साक्षर आहे. देशात डायटचे मोठे फॅड आहे. त्यामुळे एनोक्सेरीया आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो.

राजधानी ब्युनेस अर्यास येथे २८ लाख नागरिक राहतात. देशात शिक्षण मोफत आहे. आर्जेन्टिनाचा राष्ट्रीय ध्वज दोन निळ्या रंगाचे पट्टे, त्यामध्ये पांढरा रंग आणि त्यावर पिवळा सूर्य असा आहे. या देशाला निसर्गप्रेमींचा स्वर्ग मानले जाते.