ट्विटरवर मोदी, बायडेन, सुनक यांच्या खात्याला मिळाली ग्रे टिक

ट्विटरची मालकी घेतल्यापासून एलोन मस्क यांनी कंपनीत सुधारणा घडवून आणण्याचा दणका लावला आहे. रोज काही तरी नवे नियम लागू केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवरील खात्याचे व्हेरिफिकेशन करताना विविध रंगाच्या टिक चा वापर केला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकारे, अधिकारी, राजकीय नेते यांच्या प्रोफाईल वर ग्रे टिक येणार आहे. ही व्यवस्था अजून पूर्णपणे रोल आउट झालेली नसली तरी काही राजकीय नेत्यांच्या खात्यावर ग्रे टिक दिसू लागली आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि इंडोनेशियाचे जोको विडोडो यांच्या प्रोफाईलवर ग्रे टिक आली आहे.

संस्था, व्यक्ती यांच्यासाठी निळी टिक दिसणार असून मस्क यांनी ब्लू टिक साठी सब्स्क्रीप्शन घावे लागले आणि त्यासाठी पैसे भरावे लागतील अशी नवी टूम आणली आहे. द वर्जच्या रिपोर्ट नुसार ट्विटरला झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मस्क अश्या उपाययोजना करत आहेत मात्र त्यामुळे ट्विटरचे जाहिरातदार वेगाने कमी होत आहेत. मस्क यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय खेदकारक असला तरी हे होणे गरजेचे आहे.