फ्रांसचा इम्बाप्पे ‘गोल्डन बूट’ चा मानकरी

फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या अंतिम फेरीत फ्रांसला चुरशीच्या लढतील आर्जेन्टिनाने पेनल्टी शूट आउट मध्ये ४-२ अशी मात दिली असली तरी गोल्डन बूट या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरला फ्रांसचा स्टार खेळाडू इम्बाप्पे. त्याने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउट सह ८ गोल केलेच पण वर्ल्ड कप मध्ये १२ गोल करून २३ वर्षीय इम्बाप्पेने महान फुटबॉलर पेले यांच्याशी बरोबरी साधली आहे.

फिफा मध्ये आठ गोल करणाऱ्या इम्बाप्पेला उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात एकही गोल करता आला नव्हता. अंतिम सामन्यात आर्जेन्टिना प्रथमपासून आक्रमक होती आणि पहिल्या हाफ मध्येच दोन गोल आर्जेन्टिनाच्या नावावर होते. मात्र दुसरा हाफ इम्बाप्पेचा होता. त्याने केवळ ९७ सेकंदात दोन गोल मारून आर्जेन्टिनाला धक्का दिला मात्र पेनल्टी शूटआउट मध्ये आर्जेन्टिनाने चार गोल करून सामना जिंकल्यावर त्याला आपला पराभव जिव्हारी लागला आणि त्याने मैदानातच बसकण मारली. अखेर फ्रांसचे पंतप्रधान इम्युनेअल मॅक्रो यांनी त्याला मैदनात येऊन गळामिठी घातली आणि तुझा खेळ उत्तम होता असे सांगितले.

२००२ नंतर फिफा वर्ल्ड कप मध्ये आठ गोल करणारा इम्बापे हा दुसरा फुटबॉलपटू आहे. त्यावेळी ब्राझीलच्या रोनाल्डोने सर्वाधिक गोल करून हा पुरस्कार जिंकला होता. १९५८ मध्ये फ्रांसच्या फाँटेन याने वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक १३ गोल मारले होते त्याचा विक्रम आजही कायम आहे. इम्बाप्पे अंतिम फेरीत गोलची हॅट्रिक करणारा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे.