या हेल्मेटच्या किंमतीत खरेदी करू शकाल मस्त बाईक

भारतात दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट किंवा शिरस्त्राण घालणे बंधनकारक आहे. बाजारात हेल्मेटची खूप मोठी रेंज उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर तयार केलेल्या हेल्मेटच्या किंमती ४०० ते ५०० रुपये दरम्यान आहेत तर ब्रान्डेड आणि आयएसआय मार्क सह असलेल्या तुलनेने सुरक्षित हेल्मेटच्या किमती १ ते ३ हजारादरम्यान आहेत. महागात महाग हेल्मेट फार तर १० हजाराचे असेल अशी कल्पना असेल तर ती मात्र चुकीची ठरेल. कारण बाजारात एक लग्झरी बाईक सहज खरेदी करता येईल इतक्या किमतीचे हेल्मेट सुद्धा उपलब्ध असून त्याची किंमत १,३४,१२० रुपये आहे. त्याच्या खरेदीवर १५ टक्के डिस्काऊंट आहे त्यामुळे ते प्रत्यक्षात १,१३,९४६ रुपयांना मिळते आहे. एजीव्ही फिस्टा जीपी आरआर फ्युचरो असे नाव या हेल्मेटला दिले गेले आहे.

ऑनलाईन www.fc moto.डे या साईटला त्यासाठी ग्राहकाला भेट द्यावी लागेल. हे हेल्मेट दिसायला सर्वसामान्य हेल्मेट प्रमाणे आहे. पण त्याची गुणवत्ता आणि फीचर्स मुळे ते पॉवरफुल बनले आहे. त्याला एफआयएम होमोलोगेशन दिले गेले असून त्याचा अर्थ धोकादायक परिस्थितीत सुद्धा डोके सुरक्षित ठेवणे असा आहे. या हेल्मेटमध्ये कॉलरबोन सेफ प्रोफाईल, ५ फ्रंट व्हेंटस, दोन रिअर एक्स ट्रॅकर्स, मेटल एअर व्हेंट, रेसिंग फिट, शालीमार फॅब्रिक मायक्रो फायबरचे अस्तर, इंस्टंट स्वेट अॅब्झोर्बर, रीमुव्हेबल नोज गार्ड, स्कीन कम्फर्ट, चिक पॅड सेफ्टी रिलीज सिस्टीम, १९० डिग्री समतल आणि ८५ डिग्री व्हर्टिकल व्ह्यू ऑप्टीक फायबर ग्लास अशी अनेक फीचर्स आहेत.

१०० टक्के कार्बन पासून बनविल्या गेलेल्या या हेल्मेटचे वजन १४५० ग्राम असून त्याला टायटेनियम डबल डी रिंग डिव्हाइस दिले गेले आहे.