एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही हि आलिशान महाराजा एक्स्प्रेस, एका तिकिटाच्या किंमतीत खरेदी करू शकता नवीन घर


नवी दिल्ली: भारतीय रेल सेवा ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. हवाई प्रवास हा आता तसा सर्वसामान्यांच्या कक्षेत येत असला तरीही अत्यंत किफायतशीर सेवा आणि तरीही तुलनेने आरामदायक प्रवास, यासाठी बहुसंख्य प्रवासी रेल्वेची निवड करतात. मात्र, खास हौशी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेली महाराजा एक्सप्रेसची सेवा रेल्वेच्या किफायतशीरपणाबद्दलचा समज नक्कीच दूर करते.

महाराजा एक्सप्रेस ही आयआरसीटीसी कडून चालवली जाणारी एक लक्झरी सेवा आहे. द इंडियन पॅनोरमा, ट्रेजर ऑफ इंडिया, इंडियन स्प्लेंडर आणि द हेरिटेज ऑफ इंडिया या चार मार्गांवर महाराजा एक्सप्रेसची आलिशान सेवा उपलब्ध आहे. या चार पैकी एका मार्गाची निवड करून पर्यटक सात दिवसाची सफर या एक्सप्रेस मधून करू शकतात.

या एक्सप्रेस मधील सर्वात आलिशान दालनाचे तिकीट तब्बल 19 लाख 90 हजार आठशे रुपये एवढे आहे. या दालनात दोन शयन कक्ष, मिनीबार, शॉवर सुविधा असलेले स्नानगृह, डायनिंग एरिया, वातानुकूलन यंत्रणा, वायफाय, दूरदर्शन, डीव्हीडी प्लेयर, प्रत्येक दालनाला स्वतंत्र सेवक अशा सुविधा आहेत. अर्थातच या तिकीट दरात भारतातीलच काही शहरात घर घेणेही शक्य आहे. मात्र, हौसेला मोल नसते, या उक्तीप्रमाणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय आहे.

एका हौशी प्रवाशाने या आलिशान दालनाच्या आतल्या भागाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओला नेटकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्यावर मिळणाऱ्या प्रतिक्रियाही गमतीशीर आहेत. एवढा खर्च करून रेल्वे प्रवास करण्यापेक्षा मी जगाची सफर करीन आणि परतीचा प्रवास विमानाच्या प्रथम वर्गातून करीन अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने व्यक्त केली आहे, तर आणखी एकाने, एवढ्या पैशात सात दिवसाची सफर करण्याऐवजी मी कुठे