डोनाल्ड ट्रम्प आता सुपरहिरो, अंतराळवीराच्या वेशभूषेत

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःची डिजिटल कार्ड्स रिलीज केली आहेत. यात डोनाल्ड सुपरहिरो, अॅस्ट्रोनॉटच्या वेशात दिसत आहेत. या कार्ड्सच्या किमती ९९ डॉलर्स म्हणजे ८ हजार रुपये असून ट्रम्प ग्राहकांनी या कार्ड्सची खरेदी करावी म्हणून अनेक आमिषे दाखवीत आहेत.

ट्रम्प अधिक कार्ड खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना स्वतः भेटणार, व्हिडीओ कॉल करणार, सही देणार, त्यांच्या सोबत गोल्फ खेळणार अशी आमिषे दाखवीत आहेत. या संदर्भात रिलीज केलेल्या एका व्हिडीओ मध्ये ट्रम्प जे ग्राहक ४५ पेक्षा जास्त कार्ड खरेदी करतील त्यांना द. फ्लोरिडा रिसोर्ट मध्ये प्रवेश आणि पार्टी देणार आहेत.

ट्रम्प या कार्ड विक्रीतून जे पैसे मिळतील त्याचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणार नाहीत तर हे पैसे ते स्वतःजवळ ठेवणार आहेत. लोकांनी ट्रम्प यांची या बाबीवरून खूप टर उडविली आहे आणि विविध कॉमेंट केल्या आहेत. काही नागरिक ट्रम्प यांचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगत आहेत. याचे कारण म्हणजे २०२४ ची निवडणूक लढविणार अशी घोषणा करूनही त्यांना मिडियाने फारशी प्रसिद्धी दिलेली नाही.