BBL मध्ये हि टीम फक्त 15 धावांवर ऑलआऊट, फलंदाजांची दुर्दशा, T20 इतिहासातील सगळ्यात कमी स्कोर


सिडनी : झटपट क्रिकेटच्या या युगात टी-२० फॉरमॅट ला तोड नाही आहे . क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी नोंद झालेले अनेक सामने या फॉरमॅटमध्ये खेळले गेले आहेत, तर असे काही सामनेही पाहायला मिळाले आहेत ज्यात खेळाडूंनी अशीलाजिरवाणी केली आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. बिग बॅश लीगच्या चालू हंगामातील पाचव्या सामन्यातही असेच काहीसे घडले. अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यात सामना होता. एकीकडे अॅडलेड स्ट्रायकर्सचा संघ हा सामना आपल्यासाठी ऐतिहासिक मानू शकतो, तर दुसरीकडे सिडनीसाठी तो बीबीएलमधला काळा दिवस ठरला.

खरं तर, या सामन्यात सिडनीची संपूर्ण फलंदाजी फेल ठरली. त्यांनी अॅडलेडच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या आणि अवघ्या 15 धावांत त्यांचा डाव गुंडाळल्या गेला . पुरुषांच्या T20 च्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या मोसमातील पाचवा सामना अॅडलेड आणि सिडनी यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अॅडलेड स्ट्रायकर्स संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 139 धावा केल्या.

अॅडलेडविरुद्ध सिडनीच्या फलंदाजांची अशी अवस्था झाली होती की एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ब्रेंडन डॉगेट हा होता, जो दहाव्या क्रमांकावर खेळायला आला होता. त्यानंतर रिले रुसोने तीन धावा केल्या. आश्‍चर्याची बाब म्हणजे या काळात संघाच्या आठ फलंदाजांची धावसंख्या एका जादा धावेपेक्षा कमी होती.

जर आपण सिडनीच्या फलंदाजांची क्रमवार धावसंख्या पाहिली तर ती अशी होती: 0, 0, 3, 0, 2, 1, 1, 0, 0, 4 आणि 1 धाव.