मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘पठाण’ वर बंदीची मागणी


पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यातील दृश्य आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने परिधान केलेला वेश यामुळे हिंदू धर्माचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेतला गेला आहे. मध्यप्रदेशात त्यावरून मोठा वाद उद्भवला आहे.

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी साधू संतांना भेटून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही ही मागणी जोर धरू लागली आहे. समाजमाध्यमातूनही चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते कदम यांनीही, राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. इथे हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.