आला मोटोरोला चा मोटो एक्स ४० स्मार्टफोन

मोटोरोलाने त्यांचा एक्स सिरीज मधील फ्लॅगशीप स्मार्टफोन मोटो एक्स ४० चीन मध्ये लाँच केला आहे. या फोनची बेसिक ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३३९९ युआन असून १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेजची किंमत ४२९९ युआन आहे. भारतात हा फोन कधी येणार याची माहिती दिली गेलेली नाही. मात्र भारतात हा फोन ६० हजार रुपये किमतीत मिळेल असे सांगितले जात आहे. या फोनसाठी प्रीबुकिंग सुरु झाले असून २२ डिसेंबर रोजी फोन विक्री सुरु होणार आहे.

या फोनला अँड्राईड १३ ओएस, ६.७ इंची फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जेन टू प्रोसेसर, रियल ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला आहे. प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असून ५० एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स, १२ एमपीचे टेलीफोटो लेन्स तर सेल्फी साठी ६० एमपी कॅमेरा दिला गेला आहे. फोन साठी ४६०० एमएएच बॅटरी १२५ डब्ल्यू फास्ट चार्ज सपोर्ट सह आहे. सात मिनिटात हा फोन ५० टक्के चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे. १५ डब्ल्यू वायरलेस चार्जिंग सुविधा दिली गेली असून ड्युअल सिम सुविधा आहे.