ब्रिटीश राजघराण्यात भाबंदकीचे महाभारत,नेट फ्लिक्स च्या नव्या मालिकेतून आले चव्हाट्यावर


लंडन: ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन यांनी बंधू विल्यम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेट फ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तमालिकेत हे आरोप केल्याने ते चव्हाट्यावर आले आहेत.

राजघराण्यातील सदस्यांसमोर आपल्या भवितव्याबाबत बोलत असताना प्रिन्स विल्यम यांनी अकारण आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचे वागणे विचित्र होते, असा आरोप हॅरी यांनी केला.

विल्यम यांनी काही प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून मी आणि मेघन यांच्याबाबत. खोट्या बातम्या पेरल्या. त्याच्या मनस्तापामुळेच मेघन यांचा गर्भपात झाला, असा आरोपही हॅरी यांनी केला.

राजघराण्यातील कोणतीही बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्या बातमी ऐवजी राजघराण्याशी संबंधित दुसरी एखादी बातमी द्यावी लागते. हा खूप वाईट खेळ आहे. किंग चार्ल्स आणि डायना या आपल्या मातापित्यांमध्ये माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळेच दुरावा निर्माण झाल्याचेही प्रिन्स हॅरी यांनी सांगितले.

या जीवघेण्या खेळात सहभागी होण्याऐवजी आपण संपून जाणे पत्करू, असेही प्रिन्स हॅरी यांनी नमूद केले. हॅरी आणि मेघन यांनी माध्यमांपासून दूर राहून सामान्यपणे नवे आयुष्य जगण्यासाठी सन २०२० पासून राजघराण्याशी संबंध तोडले आहेत.