ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस आणि अमेरिकेच्या हिलरी जयपूर मध्ये

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जोन्सन आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी सध्या राजस्थानची राजधानी, गुलाबी शहर जयपूर मध्ये पर्यटनाचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे याच वेळी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे सुद्धा जयपूर येथेच आहेत असे समजते.

हिलरी मंगळवारी जयपूर येथे होत्या आणि त्यांनी जंतरमंतर येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी यंत्रांचे काम, पंचांग, राशीफल याविषयी माहिती घेतली. त्या २०१८ मध्ये सुद्धा जयपूरला आल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे हिलरी शहरात फिरताना दिसत होत्या.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जोन्सन गुरुवारी जयपूर येथे होते. त्यांनी आमेर फोर्ट पायी फिरून पाहिला. याच किल्ल्यावरील भुयारातून पायीच ते जयगढ येथे गेले. जयबाण तोफ पाहिली आणि गाईड कडून महाल, शिश महाल, ऐतिहासिक स्थळे, अभेद्य किल्ले यांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली गेली होती.