सिगरेटबंदी करणारा पहिला देश ठरला न्यूझीलंड

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या सरकारने देशात युवक वर्गाला सिगरेट अथवा तंबाखू उत्पादने, धुम्रपान बंदी केली असून या साठी कडक कायदा केला आहे. जगात सिगरेट अथवा तंबाखू उत्पादने वापर बंदीसाठी असा कडक कायदा करणारा न्यूझीलंड पहिला देश बनला आहे. तंबाखू उत्पादने मुक्त देश यासाठी न्यूझीलंडची वाटचाल वेगाने सुरु आहे. नव्या कायद्यानुसार १ जानेवारी २००९ नंतर जन्म झालेली कुणीही व्यक्ती तंबाखू उत्पादने खरेदी करू शकणार नाहीच पण अश्या व्यक्तींना तंबाखू उत्पादन विक्री करणारे दुकानदार सुद्धा माल विकू शकणार नाहीत.

नव्या कायद्यात सिगारेट खरेदीसाठीचे कमीत कमी वय वेळोवेळी वाढविण्याची तरतूद आहे. सध्या ५० वर्षाची जी व्यक्ती सिगरेट पाकीट खरेदी करण्याच्या प्रयत्न करेल तिला वय सिद्ध करणारे कागदपत्र किंवा वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. २०२५ पर्यंत धुम्रपान मुक्त करण्याची योजना राबविली जाणार आहे. तंबाखू आणि सिगरेट वर भक्कम कर लावल्यावर नवीन कायदा लागू केला गेला आहे.

सरकारी आकडेवारी नुसार यामुळे तंबाखू उत्पादने, सिगरेट विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या ६ हजारावरून ६०० वर येणार आहे. उपलब्ध सिगरेट मध्ये सुद्धा निकोटीनची मात्रा कमी असणार आहे. यामुळे सरकारला आरोग्य कल्याण योजनासाठी जो पैसा खर्च करावा लागतो त्यात बचत होईलच पण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.