उज्जैन महाकाल लोक मध्ये जिओच्या फाईव्ह जी लहरी

रिलायंस जिओने विविध शहरात फाईव्ह जी सेवा सुरु केली असून आता मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल लोक मध्ये जिओची फाईव्ह जी नेटवर्क सेवा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन केले गेले. यामुळे या परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांना फाईव्ह जी आणि वायफाय सुविधा उपलब्ध झाली आहे.

जिओने उज्जैन पूर्वी १ नोव्हेंबरला पुण्यात फाईव्ह जी सेवा सुरु केली असून १ जीबीपीएस अनलिमिटेड डेटाने त्याची सुरवात केली गेली आहे. उज्जैन महाकाल लोक मध्ये या सेवेची सुरवात करताना मुख्यमंत्री शिवराज म्हणाले,’ मध्यप्रदेश साठी हा ऐतिहासिक दिवस आहे. केवळ फाईव्ह जी सेवा नाही तर आत्मनिर्भर भारत लक्ष्याच्या दिशेने टाकलेले हे पुढचे पाउल आहे. त्यासाठी रिलायंस कंपनीने रात्रंदिवस मेहनत घेऊन ठरलेल्या तारखेला ही सेवा सुरु केली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन..

लवकरच इंदोर आणि मध्यप्रदेशातील अन्य शहरात ही सेवा सुरु होणार आहे. ही सेवा सुशासन, गुन्हे प्रतिबंध, सायबर गुन्ह्यांवर नजर, शेती, वाहतूक व्यवस्थापन यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल. १ जानेवारी पासून इंदोर मध्ये फाईव्ह जी सेवा सुरु केली जात आहे. महाकाल लोक मध्ये रिलायंस जिओने मंदिर, प्रशासकीय कार्यालय, महाकाल लोक, सरफेस पार्किंग येथे टॉवर्स उभारले आहेत.