असे घेऊ शकता पीव्हीसी आधार कार्ड

युआयडीएआय तर्फे काही दिवसांपासून क्रेडीट कार्ड प्रमाणे दिसणारे, टिकावू आणि बाळगण्यास सुलभ असे पीव्हीसी आधारकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे मोबाईल नम्बर रजिस्टर्ड केला गेला नसला तरी अन्य मोबाईल नंबर किवा वैकल्पिक नंबर वरून सुद्धा या पीव्हीसी आधार कार्ड साठी ऑर्डर देता येणार आहे.

myaadhaar. gov.in/ jenric pvc वर जाऊन आपला आधार कार्ड नंबर युजरने द्यायचा व नंतर CAPTCHA वर एन्टर करायचे आहे. मग सेंड ओटीपी क्लिक करायचा. मोबाईल रजिस्टर केलेला नसेल तर my mobile number is not registered वर टॅप करून अन्य नंबर द्यायचा आहे. त्याच मोबाईलवर ओटीपी येणार आहे. एकाच मोबाईल नंबर वर कुटुंबातील सर्वाची पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर देता येणार आहे. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करण्याकरता सबमिट बटण क्लिक केले कि मग आधार डीटेल्स दिसणार आहेत. मेक पेमेंट वर क्लिक केले कि युजरला पेमेंट गेटवेवर रीडायरेक्ट केले जाईल आणि तेथे ५० रुपये भरायचे आहेत. याची रिसीट मिळणार आहे. ही रिसीट डाऊनलोड करून घेता येईल. मग कार्ड संदर्भातला एसएमएस येईल आणि पाच दिवसात पीव्हीसी आधार कार्ड घरपोच दिले जाईल, अशी ही प्रक्रिया आहे.