रेडमी नोट १२ प्रो प्लस, ५ जानेवारीला भारतात

चीनी कंपनीने रेडमी नोट १२ जी प्रो फाईव्ह जी बाबत सोमवारी केलेल्या घोषणेनुसार हा फोन भारतात ५ जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे. चीन मध्ये रेडमी नोट सिरीज ऑक्टोबरमध्ये लाँच केली गेली आहे. त्यात रेडमी नोट १२ , १२ प्रो, १२ प्रो प्लस असे फोन सादर केले गेले आहेत. भारतात सुद्धा हे फोन सादर केले जाणार असून ट्विटरवर कंपनीने टीझर पोस्टर शेअर केले आहे.

रेडमी नोट १२ प्रो प्लस साठी २०० एमपीचा प्रायमरी कॅमेरा दिला जात असल्याचे सांगितले गेले असून कंपनीने मिडिया इन्व्हाईट पाठविण्याची सुरवात केली आहे. चीन मध्ये ८ जीबी रॅम ,२५६ जीबी स्टोरेजचे व्हेरीयंट २०९९ युवान म्हणजे २३ हजार रुपये किमतीत लाँच केले गेले आहे. चीन मध्ये सादर झालेल्या व्हेरीयंट मध्ये एमआययुआय १३ ओएस, ६.६७ इंची फुल एचडी ओलेड डिस्प्ले , १२ जीबी रॅम, फोटो साठी २०० एमपीचा प्रायमरी कॅमेरा, ८ एमपीचे अल्ट्रा वाईड लेन्स आणि २ एमपीचे मॅक्रो लेन्स दिले गेले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅट साठी १६ एमपी कॅमेरा आहे.

फोन साठी ५ हजार एएमएच बॅटरी १२० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे.