जगातील सर्वाधिक वेगवान इलेक्ट्रिक हायपरकार रिमॅक नॅवरा

इलेक्ट्रिक कार्स सेग्मेंटमध्ये दररोज विविध देशातील कार उत्पादक कंपन्या नवनवी मॉडेल्स बाजारात आणत आहेत. त्यात रिमॅक नॅवरा या कंपनीने त्यांची हायपर इलेक्ट्रिक कार सादर केली असून याच नावाने आलेली ही कार जगातील फास्टेस्ट इलेक्ट्रिक कार बनली आहे. ताशी ४१२ किमी वेगाने धावून रिमॅक नॅवराने रेकॉर्ड केले आहे. ० ते १०० चा स्पीड या कारणे केवळ १.९७ सेकंदात घेतला त्यामुळे तिला इलेक्ट्रिक हायपरकार म्हटले गेले आहे. या कारची किंमत २१ लाख डॉलर्स म्हणजे १७ कोटी रुपये आहे.

गेल्या काही दिवसात या कारने ४१२ किमी वेग गाठून रेकॉर्ड केले असून सिंगल चार्ज मध्ये ही कार ४८२ किमी धावेल असा कंपनीचा दावा आहे. या कार मध्ये बॅटरी परफोर्मंस पाहण्यासाठी एक आत आणि एक बाहेर खास लाईट लावले गेले आहेत.  ३५० किलो वॉटच्या चार्जरने ही कार २५ मिनिटात ८० टक्के चार्ज होते. तिला १९१४ हॉर्सपॉवरची मोटर दिली गेली आहे यामुळेच ही कार ० ते १०० किमीचा वेग १.८५ सेकंदात घेऊ शकते. या कारचे स्पीड टेस्टिंग जर्मनी मध्ये केले गेले आहे कारण येथे ४०० किमी वेगाने धावू शकणाऱ्या कार्स टेस्टिंग साठी सुविधा आहे.

कमी वेळात इतका स्पीड घेणारी ही कार ग्राहकांना मात्र खरेदी करता येणार नाही असे समजते. या कारचे डिझाईन अतिशय स्टायलिश असून पूर्ण बॉडी कार्बन फायबरची आहे. कार्बन फायबर स्टील पेक्षा पाच पटीने वजनाला हलके आणि तितकेच मजबूत असते. यामुळे कारचे वजन हलके आहे. ग्राहकांसाठी कंपनी ताशी ३५२किमी वेगाने धावू शकणाऱ्या कार्स बनवत आहे. क्रोएशियाच्या जागरेब येथील मुख्यालयात या कार्स बनविल्या जात आहेत.