एक इंचही जमीन हडप करू देणार नाही: अमित शहा


नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर, देशात जोपर्यंत मोदी सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत कोणालाही भारताची एक इंचही जमीन हडप करू देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भारतीय जवानांच्या शौर्य आणि धाडसाचे त्यांनी कौतुक केले.

विदेशी अर्थसहाय्य नियंत्रण कायद्यांतर्गत राजीव गांधी फाऊंडेशनची मान्यता रद्द करण्यात आल्याबद्दल संसदेत होणारी चर्चा टाळण्यासाठी विरोधी पक्ष प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या झटापटीबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी करत असल्याचा आरोपही शहा यांनी संसद भावनाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.

राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाकडून या कोटी ३५ रुपयांची देणगी मिळाली होती. ती विदेशी अर्थसहाय्य नियंत्रण कायद्याचा भंग करणारी होती. त्यामुळे राजीव गांधी फाऊंडेशनची नोंदणी रद्द करण्यात आली. या विषयावर चर्चा होऊ नये, यासाठीच विरोधक झटापटीचा मुद्दा लावून धरत असल्याची टीका शहा यांनी केली.