अरमान मलिक एक प्रसिद्ध YouTuber व्लॉगर आहे. अरमान मलिकला दोन बायका असून त्यांची नावे कृतिका आणि पायल मलिक आहेत. अलीकडेच अरमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पायल आणि कृतिकासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या दोन्ही बायका प्रेग्नंट दिसत होत्या. एकीकडे फोटोमध्ये दोघांचा बेबी बंप पाहून लोक आश्चर्यचकित झाले असतानाच, काही जणांनी असे कसे होऊ शकते, असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी या जोडप्याला जोरदार ट्रोल केले.
यू-ट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका कृतिका-पायल एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट , शेअर केला बेबी बंपसोबतचा फोटो , लोक म्हणाले- हे अशक्य
यू-ट्यूबर अरमान मलिकचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 2011 मध्ये अरमानचे पायलसोबत लग्न झाले होते. अरमान आणि पायल यांना चिरायू नावाचा मुलगाही आहे. पायलसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो कृतिकाच्या प्रेमात पडला आणि तिला डेट करू लागला. डेटिंगच्या एका आठवड्यानंतरच त्याने कृतिकाशी लग्न केले आणि आता तो आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहतो.
अरमान मलिकने एक फोटो शेअर केला आहे, ज्यासाठी तो जरा जास्तच ट्रोल होत आहे. यामध्ये तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत आहे. पायल आणि कृतिका फोटोमध्ये बेबी बंप दाखवत आहेत. या फोटोवर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आखिर या कोणत्या प्रकारच्या मुली आहेत ज्या आपल्या पतींना शेअर करतात’. त्यामुळे आणखी एका युजरने संतापाने या जोडप्याला ‘स्वस्त’ म्हटले आहे. तर दुसर्याने लिहिले आहे, ‘यार, हे दोघे एकत्र प्रेग्नंट आहेत’.