या देशांत साजरा होत नाही नाताळ

भारतासह अन्य अनेक देशात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. युरोपीय देशात नाताळ हा मोठा उत्सव आहेच पण जगातील अनेक देशात हा उत्सव साजरा होतो. अनेक ठिकाणी या काळात ८ दिवस ते १ महिना अशी सुट्टी दिली जाते. पण जगातील ४० देश असे आहेत जेथे नाताळच्या दिवशी सुद्धा सुट्टी दिली जात नाही तर काही देश असे आहेत जेथे अजिबात नाताळ साजरा केला जात नाही.

अनेक देश त्या त्या देशांच्या परंपरा आणि रीतीनुसार नाताळ साजरा करतात. अफगाणिस्थान मध्ये नाताळ साजरा केला जात नाही. याचे कारण म्हणजे इस्लाम आणि क्रिश्चन यांच्यात कित्येक शतके न राहिलेले संबंध. उलट या दोन्ही समाजात तणाव अधिक आहे. त्यामुळे अफगाणिस्तान मध्ये कुणी गुपचूप जरी नाताळ साजरा केला तरी त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. भूतान या भारताच्या शेजारी देशात सुद्धा नाताळ साजरा होत नाही. हा बौद्ध धर्मीय देश आहे. येथे अवघे १ टक्का क्रिश्चन आहेत. पण भूतानी कॅलेंडर मध्ये नाताळचा उल्लेख नाही.

सोमालिया या देशात नाताळ नाही. २०१५ च्या धार्मिक कायद्यानुसार नाताळला बंदी केली गेली आहे. चीन मध्ये नाताळ दिवशी सुटी नसते तर तो कामाचा दिवस असतो. चीन कोणताच धर्म मानत नाही. पण येथे नाताळ साजरा करण्यावर बंदी आहे. उझबेकिस्तान मध्ये १० टक्के क्रिश्चन आहेत तरीही येथे नाताळ नाही. मात्र येथे नवीन वर्ष उत्साहात साजरे केले जाते, नाताळ प्रमाणेच या वेळी गिफ्ट दिली घेतली जातात. पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे. येथे क्रिश्चन आहेत पण त्यांची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे येथेही नाताळ साजरा होत नाही.