नोरा फतेहीने दाखल केला जॅकलीन फर्नांडिसविरोधात मानहानीचा दावा, म्हणाली- माझे नाव ठग सुकेशशी जोडले


सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोन बॉलिवूड अभिनेत्री समोरासमोर आल्या आहेत. नोरा फतेहीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि जवळपास 15 मीडिया कंपन्यांविरोधात दिल्ली कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोरा फतेहीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “जॅकलिन फर्नांडिसने तक्रारदाराची स्वतःचे हित साधण्यासाठी गुन्हेगारी रीतीने बदनामी करण्याचा प्रयत्न केला कारण ते दोघेही एकाच उद्योगात काम करत आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी समान आहे.

जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघींची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॉनमन सुकेश चंद्रशेखरविरुद्ध नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती. गँगस्टर सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा आरोप नोरा फतेहीने केला आहे. सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत ती सुकेशला ओळखत होती.

नोराने खरोखरच सुकेशकडून लक्झरी गिफ्ट्स घेतल्या होत्या का?
नोरा फतेहीने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेतल्याचा दावाही फेटाळून लावला आहे. मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिष्ठा दुखावली गेल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. सुकेशने नोरा फतेहीचा मेहुणा बॉबीला ६५ लाखांची बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्याचे सांगण्यात आले. सुकेशने निश्चितपणे बीएमडब्ल्यू कारची ऑफर दिल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र अभिनेत्रीने ही कार घेण्यास नकार दिला. नोराला सुरुवातीपासूनच या डीलबद्दल संशय होता. सुकेश सतत नोराला फोन करत होता. त्यानंतर नोराने सुकेशचा नंबर ब्लॉक केला.

गुच्चीची बॅग सुकेशच्या पत्नीने भेट म्हणून दिली होती
एका कार्यक्रमात सुकेशची पत्नी लीना हिला भेटल्याचे नोराने तपासात ईडीला सांगितले होते. लीना नोराला गुच्ची बॅग आणि आयफोन देते. लीनाने नोराला सांगितले की तिचा पती सुकेश या अभिनेत्रीचा चाहता आहे. लीनाने सुकेश आणि नोराला फोनवर बोलायला लावले. जिथे सुकेश नोराचा चाहता असल्याबद्दल बोलला. त्यानंतर लीनाने सांगितले की सुकेश नोराला टोकन म्हणून BMW देणार आहे.