चीनी विद्यार्थ्यांनी बनविला अदृश्य करणारा सूट

चीनी विद्यार्थ्यांनी एक खास सूट डिझाईन केला आहे. हा सूट जो कुणी घालेल त्याला तिसरा डोळा म्हणजे सुरक्षेसाठी लावले गेलेले कॅमेरे फोटो मध्ये पकडू शकणार नाहीत. म्हणजे या कॅमेऱ्यावरून ती व्यक्ती गायब होईल. म्हणजे हा सूट घातला कि काही तरी आहे असे दिसते पण ती व्यक्ती माणूसच आहे हे ओळखता येत नाही. ‘इनव्हिजिबल डिफेन्स’ असे या सूट चे नामकरण केले गेले आहे.

वी दुई नावाच्या एका पीएचडीच्या विद्यार्थ्याने हा सूट तयार केला आहे. त्याने याच्या शेकडो चाचण्या घेतल्या आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार या सूटला हुआवेई टेक्नोलॉजी कंपनीने भरविलेल्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आहे. वूहान विश्वविद्यालयातील प्रोफेसर बंग झेंग यांनी या सूटचे परीक्षण केले आहे. त्यांच्या मते हा सूट घातला असला तरी कॅमेरा उपस्थिती पकडतो पण तो माणूस आहे हे दाखवू शकत नाही. रस्त्यावरचे कॅमेरे पायी चालणारी माणसे, दाखवितात, स्मार्ट कार पादचारी, रस्ते, अडचणी ओळखतात पण हा कॅमेरा वस्तू पकडायची अनुमती देतो पण तो माणूस आहे कि नाही हे स्पष्ट करू शकत नाही.

या सूटची किंमत ६ हजार रुपये आहे. ड्रोन विरोधी युद्ध, मानव मशीन आमने सामने असतील तर या सूटचा मोठा उपयोग होऊ शकणार आहे. पण या नव्या शोधाने चीन सरकारची झोप उडाली असून या सूटवर बंदी घातली जाईल असे म्हटले जात आहे.