एअर इंडिया खरेदी करणार नव्या विमानांचा ताफा

सरकारकडून टाटा ग्रुपने खरेदी केलेली एअर इंडिया, नवी विमाने खरेदीच्या तयारीत असून एका रिपोर्ट नुसार टाटा ग्रुप नव्या विमानांची ऑर्डर देण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ५०० विमाने खरेदी करणार आहे. त्यात ४०० छोटी तर १०० मोठी विमाने आहेत. मोठ्या विमानांमध्ये एअरबस ए ३५० एस, बोईंग ७८७ एस ब बोईंग ७७७ ही विमाने असतील. हे डील फायनल झाले तर एअरइंडियाच्या इतिहासात हे सर्वात मोठे डील ठरणार आहे.

२०२२ मध्ये सरकारकडून टाटा ग्रुपने एअर इंडियाचे टेकओव्हर केले असून जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडिया खासगी कंपनी बनली आहे. त्यानंतर एअर इंडिया देशातील दोन नंबरची विमान कंपनी बनली आहे. नवीन विमान खरेदी मुळे एअर इंडिया स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपली हिस्सेदारी वाढवू शकणार आहे. विस्ताराचा विलय करण्याच्या टाटा सन्सच्या निर्णयानंतर एअर इंडिया जगातील सर्वाधिक वाढत्या विमान कंपन्यामधील एक बनली आहे आणि देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कॅरीअर आहे.

यापूर्वी एअर इंडियाने त्याच्या ताफ्यात १२ विमाने भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ६ एअरबस ए ३२० नॅरो बॉडी आणि ६ बोईंग बी ७७७ एफ वाईड बॉडी विमाने आहेत.