फिफा मध्ये आता टॉप आठ संघांची अग्नीपरीक्षा

फिफा वर्ल्ड कप या ९२ वर्षे जुन्या स्पर्धेत कतार येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप मध्ये शुक्रवार पासून टॉप आठ संघांची अग्निपरीक्षा सुरु झाली आहे. पूर्व उपांत्य सामन्याच्या या साखळीत ब्राझील, क्रोएशिया, नेदरलंड, आर्जेन्टिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रांस हे संघ पोहोचले आहेत. पूर्व उपांत्य फेरीत पोहोचलेल्या या संघांपैकी चार संघ वर्ल्ड कप जिंकू शकतात तर उरलेल्या चार संघांनी ट्रॉफी अजून एकदाही उचललेली नाही. ब्राझीलने पाच वेळा, आर्जेन्टिनाने दोन वेळा तर फ्रांस आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी १ वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे.

या युद्धातील पहिला सामना ब्राझील विरुद्ध क्रोएशिया यांच्यात होणार असून ब्राझील १७ व्यांदा पूर्व उपांत्यफेरीत पोहोचलेला आहे. टॉप आठ संघात येण्याची त्यांची ही सलग तिसरी वेळ आहे. क्रोएशिया तिसऱ्या वेळी या फेरीत आला आहे. नेदरलंड आणि आर्जेन्टिना मध्ये नेदरलंड पाचव्यांदा टॉप आठ मध्ये आला आहे तर आर्जेन्टिना ने दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे.

मोरोक्को आणि पोर्तुगाल या दोन्ही संघानी वर्ल्ड कप एकदाही जिंकलेला नाही. मोरोक्को टॉप आठ मध्ये आलेला आफ्रिकेतील चौथा देश आहे तर पोर्तुगाल तिसऱ्यांदा टॉप आठ मध्ये आला आहे. इंग्लंड फ्रांस मध्ये इंग्लंड १०व्य वेळी टॉप आठ मध्ये आला आहे. या स्पर्धेत फ्रांसचा इम्बापे ५ गोल करून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.