नागपूर मेट्रोने गिनीज बुक्स मध्ये मिळविली जागा

नागपूर मेट्रोने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जागा मिळविली आहे. वर्धा रोड येथे ३.१४ किमीचा जगातील सर्वाधिक लांबीचा डबल डेकर व्हाया डक्ट मेट्रो बांधला गेला आहे. या अवघड आणि आव्हानात्मक कामासाठी गिनीज बुकचे जज ऋषी नाथ यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांचा मंगळवारी नागपूरच्या मेट्रो भवन मध्ये सर्टिफिकेट देऊन सन्मान केला.

नागपूर मेट्रोने अगोदरच आशिया बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये जागा मिळविली आहे. यापूर्वी इतका लांब मेट्रो डबल डेकर व्हाया डक्ट जगातील कुठल्याच देशात बांधला गेलेला नाही. वर्धा रोडचे काम सुरु करणे आव्हानात्मक होते. तीन पातळ्यांवर बांधकाम करावे लागणार होते. सर्वात वर मेट्रो, त्याखाली हायवे आणि त्याखाली सध्याचा रस्ता असा हा तिपदरी मार्ग आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रो प्रशासन, सर्व इंजिनीअर्स, कर्मचारी आणि बांधकाम मदतगार याचे यासाठी खास कौतुक केले आहे.